औषध विक्रेत्याच्या संपाला अल्प प्रतिसाद

मुंबई – राज्यातील औषध विक्रेत्यांनी सोमवारपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. त्याच्या मागण्यासाठी औषध विक्रेते १८ डिसेंबरला नागपूरला मोर्चाही काढणार आहेत. त्यानी पुकारलेल्या बंदला राज्यभरात अल्पसा प्रतिसाद लाभला असून शहरी भागात ८० टक्कयापेक्षा अधिक दुकाने उघडीच दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईचा धडाका सुरु केला असल्याने याचा निषेध म्हणून औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. ‘एफडीए’च्या औषध दुकानांवरील छापा अवैध आहेत. काहीही कारणांवरुन परवाना निलंबित करण्याचा प्रकार थांबवावा. औषध विक्रेत्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत.

विविध कारणांनी तीन ते साडेतीन हजार औषध विक्रेत्यांची रद्द झालेली लायसन्स परत मिळावीत. औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापून त्यावर निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी व्हावी, अशीही मागणी औषध विक्रेत्यांनी केलीय.

दरम्यान, औषध दुकान बंद ठेऊ नये, अन्यथा औषध मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी सूचना अन्न औषध प्रशासन विभागाने दिली आहे. त्याचबरोबर जनसंपर्कासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. बंद दरम्यान लोकांना काही तक्रारी असल्यास संपर्क साधण्यारचे आवाहन अन्न-औषध प्रशासनाने केला आहे.

Leave a Comment