जो जेल से डरेगा, वो कुछ नही करेगा – लालूप्रसाद

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि चारा घोटाळ्याचे आरोपी लालूप्रसाद यादव यांची आज सोमवारी जामीनावर सुटका झाली आहे. त्यामुळे ते जेलमधून बाहेर आले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने लालूंना तीन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर कारागृह प्रक्रिया पूर्ण करून लालू आज जेलबाहेर आले. जेलबाहेर आल्यानंतर लालूंनी आपल्या ’अलग अंदाजात’ प्रतिक्रिया दिली. जो आदमी जेल से डरेगा वो कुछ नहीं कर सकता, जेल हमारे कृष्ण भगवान की जन्म भूमी है असं लालू म्हणाले.

इतकंच नाही तर आपण देशभरात निवडणूक प्रचार करणार असून, नरेंद्र मोदींशीही लढण्यास तयार आहे, असं लालूंनी सांगितले. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने १७ वर्ष जुन्या ३७.७ कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिवाय त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. लालू ३ ऑक्टोबरपासून रांची तुरुंगात कैद होते