शीशराम ओला यांचे निधन

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री आणि राजस्थानमधील काँग्रेसचे दिग्गज नेते शीशराम ओला यांचे आज दिल्लीत पोटाच्या विकाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रविवारी गुडगावमधील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

झुंझुनू मतदार संघातून निवडून आलेले ओला यांनी आठ वेळा विधानसभा आणि पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होते. समाज सेवेसाठी त्यांना १९६८ मध्ये पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री आणि राजस्थानमधील काँग्रेसचे दिग्गज नेते म्हसणून शीशराम ओला यांची ओळख होती.

केंद्रीय मंत्री शीशराम ओला यांची गेल्या महिनाभरापासून प्रकृती खालावली होती. त्यामुळे राजस्थानमधील निवडणुकांसाठीच्या प्रचारात ते सहभागी झाले नव्हते. त्यांलच्यारवर गेल्याथ माहिनाभ्रापासून गुडगावमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी गुडगावमधील रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.