विराट व अनुष्का करणार लवकरच साखरपुडा

मुंबई: टीम इंडियाचा युवा फलंदाज विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात सध्या काहीतरी सुरु असल्याची चर्चा प्रसारमाध्यिमांमध्येि आहे. सध्या दोघांची वाढती मैत्री चर्चेचा विषय आहे. इतकेच नाही तर हे दोघे आगामी काळात लवकरच साख्रपुडा करण्याची शक्यता आहे.
मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दोघांकडूनही समजलेली नाही.

सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौ-यावर आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका ३० डिसेंबरला संपणार आहे. त्यानंतर कोहली ३१ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेहून मुंबईत येईल. मुंबईत आल्यानंतर विराट अनुष्काला भेटणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

विराट आणि अनुष्का एका जाहिरातच्या निमित्ताने भेटले होते. यानंतर दोघांचा भेटण्याचा सिलसिला सुरु झाला. काही दिवसांपूर्वीच हे दोघेही अनुष्काच्या गाडीत दिसले होते. सध्या दोघांची वाढती मैत्री चर्चेचा विषय आहे. इतकेच नाही तर हे दोघे आगामी काळात लवकरच साख्रपुडा करण्याची शक्यता असल्या ची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Leave a Comment