तंतूमय अन्न जोखीम कमी करतात

आपण घेत असलेल्या आहारामध्ये तंतूमय खाद्यपदार्थांचे प्रमाण अधिक असावे असा सल्ला संबंधित तज्ञ मंडळी नेहमीच देत असतात. कारण तंतूमय पदार्थ जेवढे जास्त खाल्ले जातील तेवढा कोठा साङ्ग होतो आणि हे तंतूमय पदार्थ अन्नपदार्थांचे पचन सोपे करतात. परिणामी तंतूमय पदार्थ खाणे कर्करोगापासून बचाव करण्यासही उपयुक्त ठरते. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. परंतु तंतूमय पदार्थांचे आपल्या आरोग्यावर होणारे आणखी काही परिणाम समोर आले आहेत. आहारामध्ये तंतूमय पदार्थांचा अधिक समावेश करणारी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा पहिला झटका येण्यापासून बचावू शकते. असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे.

रक्तदाबाचा ऍटॅक किंवा मेंदूचा ऍटॅक येण्याची शक्यता तंतूमय पदार्थांचे सेवन करणार्‍याच्या बाबतीत कमी असते. तंतूमय पदार्थ म्हणजे कोणत्याही खाद्यान्नाचा असा भाग असतो की जो शरीरात शोषून घेतला जात नाही आणि तो शरीरात शोषून न घेतल्यामुळे सहजपणे शरीराबाहेर टाकला जातो. त्याला शरीराबाहेर टाकण्यासाठी पचनशक्तीमध्ये त्याच्यावर ङ्गारशी प्रक्रिया करावी लागत नाही आणि हे पदार्थ शरीराबाहेर पडताना सोबत पचनसंस्थेतल्या सर्व अशुध्द पदार्थांना घेऊन बाहेर पडतात.

आपल्या शरीराला हे तंतूमय पदार्थ कशा कशातून मिळू शकतात याची यादीही शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. आवरणासहीत असलेली धान्ये, डाळी, टरङ्गलासहीत शेंगादाणे, पालेभाज्या आणि ङ्गळे यातून हे तंतूमय पदार्थ प्राप्त होत असतात. १९९० ते २०१२ या २२ वर्षांमध्ये अमेरिकेत या संबंधात करण्यात आलेल्या ८ संशोधन प्रकल्पांचे निष्कर्ष संकलित करून त्यांचा अभ्यास केला असता वरील निष्कर्ष प्राप्त झाला आहे.

त्यातून असे आढळले आहे की तंतूमय पदार्थांचे सेवन जास्त करणारे लोक लठ्ठ असतील, धूम्रपान करत असतील किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असतील तर त्यांच्या जीवनामध्ये या पैकी कशाचा तरी झटका येण्याची शक्यता असते. मात्र या लोकांनी आपल्या जेवणामध्ये तंतूमय पदार्थांचा समावेश प्राधान्याने केला तर त्यांना हे झटके येण्याची शक्यता दुरावते. अमेरिकेतल्या अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मासिकामध्ये हे संशोधन प्रसिध्द करण्यात आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment