अजित पवार यांनी बीडमधून निवडणूक लढवावी- पंकजा मुंडे

बीड: उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याकतील राजकीय दरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर नव्हे तर बीड मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे यांनी दिले आहे.

पाबळ येथे महायुतीच्या वतीने भरवण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात आमदार पंकजा मुंडे बोलत होत्या. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास माढा किंवा शिरुर मधून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी नागपुर येथे केले होते. त्याला आव्हान देताना पंकजा मुंडेंनी पवारांना बीडमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.

गेल्याा काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यातील शितयुद़ध सुरुच आहे. त्यामध्ये आता पंकजा मुंडे यांनी उडी घेत उपमुख्यीमंत्री पवार यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे आता याचे उत्तर पवार कसे देतात याकडे लागले आहे.

Leave a Comment