मसुरी – हनिमूनसाठीचे फेव्हरिस्ट डेस्टीनेशन

हव्याहव्याशा थंडीत आपल्या साथीदारासोबत अधिक गहिरे होत जाणारे संबंध फुलविण्यासाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले हिमालयाच्या कुशीतले मसुरी हे जस्ट मॅरिडांचे जसे हनिमूनसाठीचे फेव्हरिट डेस्टीनेशन आहे तसेच दुसर्यां दा हनीमूनला जाणार्यां चेही आवडते पर्यटन स्थल आहे. हिमालयाचा विविध रांगाचे नयनमनोहर दर्शन घडविणारे आणि असंख्य प्रकारची फुले, वनस्पती, हिरव्यागार डोंगररांगा अंगाखांद्यावर खेळविणारे छोटेसे टुमदार शहरही आहे. डून व्हॅली पाहावी ती मसूरीतून. परिकथेत शोभावे असे हे स्थळ सहा हजार फूट उंचीवरचे हिल स्टेशन आहे.

mussoorie1

(फोटो सौजन्य – IndianHoliday)
असे सांगतात की या सुंदर ठिकाणाचा शोध १८२७ साली कॅप्टन यंग या ब्रिटीश लष्करी अधिकार्यााने लावला. त्याकाळात तेथे त्याने हॉलिडे रिसॉर्ट सुरू केले आणि आज ते महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे. मसुरीत हिंडायचे म्हणजे आसपासची सौदर्यस्थळे पाहण्यासाठी सतत चढउतार करण्याची तयारी ठेवायची.

mussoorie

शहरापासून पाच किमीवर असलेला लाल तिब्बा येथे डोंगर चढून गेल्यानंतर दिसणारा पिक्चर पॅलेस पहायलाच हवा. सर्वात उंच जुने दीपगृह येथे आहे. १५ किमीवर असलेला सुंदर केम्प्टी फॉल म्हणजे धबधबा पाहण्याच्या वाटेवरच हे ठिकाण आहे. याच रस्त्यावर साधारण १० किमी अंतरावर लेकमिस्ट हे ठिकाण लागते.

mussoorie2

शहरातील मॉलपासून दोन किमीवर असलेली हॅपी व्हॅली म्हणजे पाच हजार तिबेटी लोकांची वसाहत आहे. याच रस्त्यावर तिबेटीयन बुद्ध टेंपल आहे. दलाई लामा तिबेट सोडून आले तेव्हा प्रथम मसुरीतच ते राहिले होते. नंतर त्यांना भारत सरकारने आश्रय दिला आणि धरमशाला येथे ते राहिले. मसूरीपासून २८ किमीवर असलेले धंतोली हे घनदाट शांत जंगल इको पार्क म्हणूनही ओळखले जाते. याच रस्त्यावर हिमालयातील विणकरांची दुकाने असून नैसर्गिक रंग असलेल्या शाली, स्वेटर, स्कार्फ, स्टोल, टोप्या इथे उत्तम मिळतात. इरी सिल्कचे कापड आणि पश्मीना शाली ही येथली खास वैशिष्ठे.

mussoorie3

बाकी बाजारात हिंडण्यातही एक सुख असून अनेक प्रकारच्या वस्तूंनी दुकाने भरलेली आहेत. भेटी देण्यासाठी अनेक प्रकारचे मेणबत्ती स्टँड, दिवे, पोर्सेलिनच्या वस्तू ग्राहकांना भुरळ घालतातच पण येथे जुने फर्निचरही पाहता क्षणी खरेदी करावे असे वाटते. लाकडी कोरीव कामाच्या अनेक सुंदर वस्तू, काठ्या, दागिन्यांच्या बॉक्स, कोरीव लाकडी बाऊल्स, ट्रे अशा अनेक वस्तू येथे मिळतात.

mussoorie4

मसुरी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ असल्याने जागोजाग हॉटेल्स आहेत. राहण्याची सोय उत्तम होऊ शकते तसेच खाण्यापिण्याचीही. सर्व प्रकारचे जेवण येथे मिळते. अगदी दाक्षिणात्य डोसेसुद्धा मिळतात. फक्त ते फार महाग विकतात. डेहराडून येथे येऊन मसुरीला जाणे सोयीचे पडते. थंडीत येथील हिमवर्षाव एकदा तरी अनुभवावा असा असतो. उन्हाळ्यात पर्यटकांची प्रंचड गर्दी असते त्यामुळे आगावू आरक्षण करून मगच मसुरीची ट्रीप आखावी हे उत्तम.

Leave a Comment