सिंगापूर- गेल्या रविवारी आशियाई कर्मचार्यांमध्ये उसळलेला हिंसाचार आणि त्यात झालेले मृत्यू यांची गंभीर दखल घेऊन सिंगापूर सरकारने आशियाई बहुसंख्येने असलेल्या लिटल इंडिया भागात आठवड्याच्या अखेरीपर्यंत दारू विक्री तसेच दारू पिण्यावर बंदी घातली आहे.

सरकारी आदेशानुसार या भागात १.१ किलोमीटरच्या परिसरात दारू विक्री करणे अथवा पिण्यास बंदी असून आदेश मोडणार्यांना अटक करून शिक्षा केली जाणार आहे. पोलिस उपायुक्त टी. राजाकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात दारू प्यायलेला कुणी आढळला अथवा दारू विक्री करणारा कुणी आढळला तर त्याला अटक करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पब्लीक ऑर्डर अॅक्ट नुसार ही बंदी घातली गेली आहे. गेल्या रविवारी या भागात उसळलेल्या दंगलीत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत तर २४ जणांना अटक करण्यात आली आहे.