रमणसिंग यांचा तिसर्‍यांदा शपथविधी

रायपूर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून डॉ. रमणसिंग यांनी काल शपथ घेतली. रमणसिंग हे मुख्यमंत्री म्हणून तिसर्‍यांदा विराजमान झाले आहेत. मुळात व्यवसायाने डॉक्टर असलेले रमणसिंग यांनी काल २५ हजार लोकांच्या उपस्थितीत शपथ घेतली. राज्यपाल शेखर दत्त यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य वरिष्ठ नेते, त्याचबरोबर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दल आणि शिवसेेनेचेही नेते या समारंभाला उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदाच्या आपल्या तिसर्‍या कार्यकालात आपण छत्तीसगडच्या विकासासाठी जीवापाड प्रयत्न करू आणि छत्तीसगडला देशातले सर्वात उत्तम राज्य बनविण्याचा प्रयत्न करू असे डॉ. रमणसिंग यांनी शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

डॉ. रमणसिंग यांच्या या शपथविधीला लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी, राजनाथसिंह, नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर, प्रकाशसिंग बादल, उध्दव ठाकरे, वसुंधराराजे, शिवराजसिंह चौहान, अर्जुन मुंडा आणि विशेष म्हणजे छत्तीसगडमधील कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री तसेच रमणसिंग यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी अजित जोगी हे यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment