बिग बीच्या सिनेमात रणबीरचा आयटम नंबर

बिग बीच्या भूतनाथ रिटर्न्स या सिनेमात रणबीर कपूर आयटम साँग करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या निमित्ताने रणबीर प्रथमच बिग बी सोबत दिसणार आहे. मात्र सध्या रणबीर अन्य शूटिंग मध्ये व्यस्त असल्याने या गाण्याचे शूटिंग रखडले आहे असेही सांगितले जात आहे. या सिनेमातील एका गाण्यासाठी रणबीरची निवड केली गेली आणि बिग बीमुळेच रणबीरने हे गाणे करण्यास तत्काळ संमती दिली असेही समजते.

बिग बीच्या गाजलेल्या भूतनाथ या सिनेमाच्या दुसर्‍या भागाचा मुहूर्त  त्यांच्या वाढदिवशी म्हणजे ११ आक्टोबरला करण्यात आला. पहिल्या सिनेमात बिग बी सोबत जुही व शाहरूख खान होते. दुसर्‍या भागाचे निर्माते भूषणकुमार असून दिग्दर्शन नितेश तिवारी करणार आहेत. दुसर्याल भागातही बिग बी दयाळू भूताच्या रूपातच दिसणार आहेत.