निवृत्तीनंतर सचिन उतरला राजकारणाच्या पिचवर

नवी दिल्ली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी खासदार सचिन रमेश तेंडुलकर राजधानी नवी दिल्लीला रवाना झाला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर मास्टर ब्लास्टर पहिल्यांदाच अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे. लोकपाल विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सचिन आज अधिवेशनात हजेरी लावणार आहे.

अभिनेत्री रेखा आणि उद्योजक अनू आगा यांच्यासह नामनियुक्त खासदार म्हणून गेल्या वर्षीच्या एप्रिल २०१२ मध्ये सचिनची राज्यसभेवर वर्णी लागली होती. खासदार सचिन तेंडुलकरसोबत त्याची पत्नी अंजलीही आज दिल्लीला रवाना झाली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानानंतर सचिनची राजकारणाच्या मैदानात बॅटिंग सुरु झाली आहे. खासदार झाल्यानंतर सचिनने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हजेरी लावली होती. आधी क्रिकेटमुळे सचिनला अधिवेशनाला उपस्थित राहता येत नव्हंत. मात्र क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन आता खासदाराची इनिंग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

Leave a Comment