नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी

नवी दिल्ली – आणखी अठरा दिवसांनी सुरू होणार्‍या २०१४ या नवीन वर्षात सरकारी कर्मचार्यां ची चांगलीच चंगळ असून हे वर्ष म्हणजे सुट्टयांची जणू दिवाळीच ठरणार आहे. या वर्षात सरकारी कर्मचारी, बॅका, शाळा महाविद्यालये तसेच अन्य सरकार संबंधीत संस्थांतील कर्मचार्‍यांना सुट्टांची सेंच्युरी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. या वर्षात १०१ सुट्ट्या आल्या आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाने पुढील वर्षातील सुट्टांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गतवर्षीपेक्षा या वर्षात चार सुट्टा जादा आल्या आहेत. चार मोठ्या सुट्ट्या रविवारी आल्या असून त्यात २६ जानेवारी, १३ एप्रिल -महावीर जयंती, १० ऑगस्ट रक्षाबंधन, आणि ५ आक्टोबर बकरी ईद यांचा समावेश आहे. या सुट्टया अन्य वारी आल्या असत्या तर सुट्टयांची संख्या १०५ वर गेली असती.

नवीन वर्ष लीप इयर नाही. त्यामुळे ३६५ दिवसांत ५२ रविवार, सेकंड फोर्थ शनिवार मिळून २४, तसेच सण, जयंत्या, पुण्यतिथ्यांच्या  २२ व राखीव ३ अशा सुट्ट्या आहेत.

Leave a Comment