संगणकीकृत रेशनकार्डे सहा महिन्यात मिळणार

पुणे – राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जात असलेल्या बारकोडसह संगणकीकृत केलेल्या रेशनकार्डांची छपाई अंतिम टप्प्यात आली असून येत्या सहा महिन्यांत ही रेशनकार्डे नागरिकांना वाटली जातील असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक वितरण दुकानातून बोगस रेशनकार्डांचा वापर करून घेतले जात असलेले धान्य व अन्य गैरप्रकरांना यामुळे आळा बसेल असा विश्वास सरकारला वाटतो आहे. विधानसभेत प्रश्नाच्या तासाला विरोधी पक्ष आमदार विनोद तावडे यांनी राज्यात ५४ लाख रेशन कार्डे बेागस असल्याप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. त्या संदर्भात देशमुख यांनी वरील माहिती दिली आहे. अन्न सुरक्षा योजनेचा फायदा राज्यातील सात लाख नागरिकांना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment