रोटेटिंग कॅमेर्‍यासहचा पहिला स्मार्टफोन सादर

जगातला रोटेटिंग कॅमेर्‍यासहचा स्मार्टफोन चीनी कंपनीने ओपो एन वन नावाने बाजारात आणला असून यामुळे युजरला मागून पुढून कुठूनही उत्तम फोटो काढता येणे शक्य होणार आहे. ज्या ग्राहकांना सातत्याने काही तरी नवीन आणि अपूर्व सोयी असलेल्या गॅजेटची खरेदी करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन आदर्श खरेदी ठरेल असा कंपनीचा दावा आहे.

याच कंपनीने १३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन सर्वप्रथम लाँच केला होता. नव्या फोनमध्येही १३ मेगापिक्सलचा कॅमेरा असून हा कॅमेरा २०६ डिग्रीतून फिरू शकतो. त्यामुळे एकाच अँगलने फोटो न काढता कोणत्याही अँगलने फोटो काढता येतात. अॅड्राॅडच्या नव्या कलर नावाच्या ऑपरेटिग सिस्टीमवर हा स्मार्टफोन चालणार असून ही सिस्टीम फक्त याच कंपनीसाठी तयार केली गेली आहे असेही समजते.

या फोन कॅमेर्‍यामध्ये सहा फिजिकल लेन्सचा वापर केला गेला आहे. त्याला बसविलेल्या सेन्सरमुळे कमी प्रकाशातही चांगल्या दर्जाचे फोटो काढता येतात. कंपनीने हा फोन सध्या फक्त पांढर्‍या रंगात सादर केला असून त्याचे वजन २१३ ग्रॅम आहे तर स्क्रीन ५.९ इंचाचा आहे.

Leave a Comment