कॅनडा सांगतोय उत्तर ध्रुवावर हक्क

ओटावा- कॅनडाने त्यांची अटलांटिक महासागर सीमा वाढविण्याची मागणी करणारे निवेदन संयुक्त राष्ट्रांपुढे मांडले असल्याची घोषणा करतानाच उत्तर ध्रुव व आसपासच्या आर्क्टिक महासागरावरही हक्क सांगण्याचा इरादा असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

कॅनडाच्या पूर्व व अतिपूर्व समुद्राचे गेली १० वर्षे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाचे व आपल्या दाव्यासाठी भक्कम पुरावे मिळाल्याचे विदेशमंत्री जॉन बेयर्ड यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले की हे पुरावे मिळाल्यामुळेच आम्ही महाद्विप सीमा संबंधित आयोगापुढे उत्तर ध्रुव आणि आर्क्टिक महासागरावर दावा सांगितला आहे.