राजीव शुक्ला ‘तो’ भूखंड परत करणार

मुंबई – मुंबईतील भूखंड घोटाळ्याप्रकरणी संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला जोगेश्वरी येथील भूखंड परत करणार आहे. जोगेश्वरी येथील कोट्यावधीचा भूखंड शुक्लांना केवळ ९८ हजारांना मिळाला होता. या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठावला होता.

शुक्ला यांनी ४ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रही लिहले होते. जोगेश्वरी येथील हा भूखंड शुक्लांच्या इAॠ फिल्म्स एज्युकेशन सोसायटीला मिळाला भूखंड होता. मात्र, त्यावर एसआरए स्कीम लागू करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे हा घोटाळा १००० कोटी रुपयांचा असल्याचा आरोप त्यांनी सोमय्या यांनी केला होता. मात्र आपण कोणतही चुकीचं काम केलं नाही असा दावा शुक्ला यांनी केला. तर आता या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली.

Leave a Comment