येत्या दोन दिवसांत थंडी कमी होणार

मुंबई- येत्या दोन दिवसात बंगालच्या उपसागराहून चेन्नईच्या दिशेने वाहणा-या ‘मडी’ वादळामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी व्यक्त केली. मडी सध्या चेन्नईच्या जवळपास आहे. एक दिवसात मडी चेन्नईच्या आसपास धडकण्याची शक्यता आहे. मडीची तीव्रता कमी असली तरीही ते नैऋत्य दिशेकडे वळण्याची शक्यता आहे. त्याामुळे आगामी दोन दिवसात राज्याितील थंडीचा कडाका कमी होणार आहे. दरम्यान मंगळवारीही थंडीच्या कडाक्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्हे गारठून गेल्याचे आढळले.

येत्या दोन दिवसांत मडी वादळ धडकताच उत्तरेहून थंडीसाठी वाहणारे वारे हे राज्यातून सरकण्याऐवजी ईशान्य दिशेकडे सरकतील. परिणामी, राज्यभरातील थंडीचा जोर ओसरेल. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होवून कडाक्याची थंडी काही काळ दूर लोटेल, असेही खोले यांनी सांगितले.

दरम्यान मंगळवारीही थंडीच्या कडाक्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्हे गारठून गेल्याचे आढळले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे तापमान १२ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाल्याची नोंद आहे. प्रामुख्याने अहमदनगर, पुणे, तसेच पूर्व महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आहे. मराठवाडय़ाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास आढळले.

Leave a Comment