मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलचे विलीनीकरण ?

तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज आणि प्रतिस्पर्धी कंपन्या अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट पुढील ५ ते १० वर्षात केवळ बरोबरीने काम करतील असेच नाही तर या दोन कंपन्या एकमेकांत विलीन होतील असा अंदाज मार्केट अॅनालिस्ट कीथ फिट्झझेराल्ड यांनी एका मुलाखतीत व्यक्त केला आहे. मनी मॅप प्रेस या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा अंदाज दिला आहे.

कीथ यांच्या मते भविष्यात जगाला कशाची गरज आहे आणि त्याच्या काय अपेक्षा आहेत याचा विचार केला तर तंत्रज्ञानाशिवाय जगाला भविष्यात पर्याय नाही. इतकेच नव्हे तर आगामी काळात तंत्रज्ञान मार्केटही प्रचंड वेगाने वाढणार आहे. अॅपल मायक्रोसॉफट या दोन बलाढ्य कंपन्यांना गुगल/अँड्राईड आणि फेसबुकशी स्पर्धा करावी लागणार आहे आणि त्यासाठी या कंपन्यांना एकत्र काम करणे भाग पडेल असा अंदाज आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या सिक्युरिटी आणि कंटेंट यांना सर्वाधिक महत्त्व आहे आणि त्यासाठी मायक्रोसॉफट आणि अॅपल यांचे विलीनीकरण हा अतिशय योग्य मार्ग आहे.

Leave a Comment