भूमिकेत आत्मा असण्याची गरज- सीमा विश्वास

एखाद्या भूमिकेचे चरित्र डोळ्यासामोर आणून तिचा अभ्यास करण्याची सवय आण्यामची गरज आहे. रोल करीत असताना स्वत:ला माग काढावा लागतो. जेव्हा खूप राग येतो, रडू येते, हातपाय थरथरायला लागतात, तेव्हाच ती भूमिका सापडलेली असते. भूमिकेत आत्मा नसला, तर त्यात काहीच नसते असे मत ‘बँडिट क्वीन’ या सिनेमाची अभिनेत्री सीमा विश्वा,स यांनी व्य क्त केले.

‘बँडिट क्वीन’ या पहिल्याच सिनेमातून चांगला अभिनय करीत असताना विश्वास यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. डॉ. मनोज निठरवाल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सीक अँड हाइड’ या सिनेमात सीमा यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे. या सिनेमाच्याअ निमित्ताने त्यांनी आपल्या अभिनयप्रवासाला उलगडला अन् भावी कलावंतांना अभिनयाचे धडेही दिले.

एखाद्या भूमिकेचे चरित्र डोळ्यासामोर आणून तिचा अभ्यास करण्याची आपली सवय सीमा यांनी उलगडली. सीमा म्हणाल्या, सिनेमात माझी अगदी छोटीशी भूमिका असली, तरी त्या भूमिकेच्या आतापर्यंतचा जीवनप्रवास काय असू शकेल हे मी डोळ्यासमोर आणते. उठता-बसता सतत तोच विचार करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष अभिनयासाठी उभे राहिल्यानंतर मात्र मेंदूपेक्षा हृदय जे सांगेल तसे करत जावे.’