
भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झालेच तर जगातील किमान २ अब्ज लोक दुष्काळाने मरतील कारण त्यांना अन्नच मिळणार नाही असा निष्कर्ष इंटरनॅशनल फिजिशियन फॉर द प्रिव्हेंशन ऑफ न्यूक्लिअर वॉर संस्थेच्या सह अध्यक्ष इरा हेलफंद यांनी मांडला आहे. असे युद्ध झाले तर मानवी संस्कृतीचा विनाश तर होईलच पण जगाच्या लोकसंख्येच्या पावपट लोक यात मृत्युमुखी पडतील. यासाठी भारत पाकने त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रातील केवळ १ टकका अण्वस्त्रांचा वापरही पुरेसा ठरणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
