प्रतिष्ठा राखण्याचे टीम इंडियापुढे आव्हान

सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या वन डे मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना बुधवारी खेळवला जाणार आहे. सुरूवातीच्याव दोन सामन्यारत टीम इंडियाला पराभव स्वीाकारावा लागल्याूने तिस-या सामन्या‍त आता प्रतिष्ठार राखणयासाठी टीम इंडियाला विजय मिळवावा लागणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता हा सामना सुरू होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दोन्ही सामन्यांत टीम इंडियाचा धुव्वा उडवून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता सेंच्युरियन वन डे तरी जिंका असंच धोनी ब्रिगेडला ओरडून सांगण्याची भारतीय चाहत्यांवर वेळ आली आहे. सलग दोन सामन्यांत यजमानांनी टीम इंडियाला धूळ चारली आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेतली वन डे मालिका तर धोनी ब्रिगेडने गमावली आहे. आता तिसरी वन डे जिंकून क्लीन स्वीप करण्याचा यजमानांचा प्रयत्न आहे. तर भारतासाठी हा सामना प्रतिष्ठेची लढाई बनला आहे. या मालिकेतला फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताची पिछेहाट होताना दिसत आहे. यजमानांच्या बॅटमधून धावांचा ओघ कसा थांबवायचा? हशिम अमला आणि क्विंटन डी कॉक ही त्यांची सलामीची जोडी कशी फोडायची हे भारताच्या गोलंदाजांना पहिल्या दोन सामन्यांत उमगलेलं नाही. या दोघांना कसं रोखायचं हे कोडं धोनी ब्रिगेडला सोडवावं लागेल.

Leave a Comment