शतायुषींचे रहस्य

दीर्घायुष्य लाभणे ही देवाची कृपाच मानली जाते. कारण चांगले जीवन जगण्या-साठी अनेक प्रकारची पथ्ये पाळली तरी लोक १०० वर्षे जगू शकतीलच याची काही शाश्‍वती देता येत नाही. असे असले तरी दीर्घायुष्य लाभणे बर्‍याच अंशी आनुवंशिकते-वर अवलंबून असते, असे आजवर दिसून आलेले आहे. कारण जगाच्या पाठीवर असे काही मानव वंश आहेत की, ज्या मानव वंशात बरेच लोक दीर्घायुषी असतात. म्हणजे या विशिष्ट समाजात ङ्गिरायला लागलो की, ७० वर्षांचे बरेच तरुण आढळतात. ९०-९५ वर्षांचे साधारण वृद्ध जागोजाग दिसतात. १०-२० लोकांच्या मागे एखादा १०० वर्षे ओलांडल्याचा दावा करत असतो. असा सारा दीर्घ जगलेल्या लोकांचा माहोल असतो. अशा मानव वंंशामध्ये रशियाजवळच्या कॉकेशस पर्वतांच्या रांगेतील अबकाझिया या वंशाच्या लोकांचा समावेश होतो.

दक्षिण अमेरिकेतील विल्काबांबन्स, पाकिस्तानातील हुंजा, ग्रीस मधील क्रेट आणि जपानमधील ओकिनावा या जातींच्या लोकांमध्ये दीर्घजीवी लोक विपुल संख्येने आढळतात. या लोकांना त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले असता ते आहारा वर भर देतात. प्रत्यक्षात त्यांच्या हवामानाचा ही परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला आहे. परंतु त्या त्या जातींमध्ये रूढ असलेल्या काही परंपराही त्यांच्या निरोगी जीवनशैलीला कारणीभूत ठरलेल्या आहेत. या सर्व मानव वंशांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा तुलनात्मक आढावा घेतला असता हे लोक मितााहारी असल्याचे आढळले आहे.

पोटापुरते परंतु चार घासाची भूक ठेवून जेवणे ही त्यांच्या जेवणाची सवय आहे. शिवाय ते काम करीत असतात. या सर्व मानव वंशांमध्ये कष्टाच्या कामांना अजूनही प्रतिष्ठा आहे. त्यांची जीवनपद्धतीच तशी आहे. शेतात जाऊन झाडे तोडणे, डोंगर चढणे-उतरणे, पाणी वाहून आणणे, पाणी शेंदणे अशी कामे हे लोक अगदी नव्वदीत सुद्धा करतात. काही काही लोक तर ११२-११५ वर्षांचे झाले तरी काम करायचे थांबवत नाहीत. या सर्वांना बैठ्या जीवनशैलीचे वावडे आहे. त्यामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त राहते. त्यांना आपल्या आहाराचे शास्त्र माहीत नाही, परंतु ते त्यांच्या आहारामुळेच दीर्घ जीवन जगू शकत आहेत. हे डॉक्टरांना कळत आहे आणि डॉक्टर मंडळी दीर्घ जीवन जगू इच्छिणार्‍यांंंना याच लोकांचे अनुकरण करण्याचा सल्ला देत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही