शाहरूख खानने केले अमिरचे कौतुक

बॉलिवूडवर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ राज्य करणारे दोन अभिनेते म्हणजे शाहरूख व आमिर खान देखील आता झाले गेले विसरून एक झाले आहेत. एकमेकांत स्पर्धा असल्याचे त्यांनी कधी बोलून दाखवले नाही पण एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधीही सोडली नाही. मात्र आता त्यांच्यातील हे शत्रुत्व किंवा स्पर्धा जरासे थंडावल्याचे दिसत आहे. अनेक पार्टीत ते एकत्र गप्पा मारतानाही दिसतात. आता तर शाहरूख खानने अमिरचे कौतुक केले आहे.

गेल्याा काही दिवसांपासून तर शाहरूखने एक पाऊल पुढे येत आमिर खान बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेता असल्याचे सांगत चक्क त्याचे कौतुक केले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शाहरूखने, आमिर हा सिनेमातील सर्वोत्तम अभिनेता असून इतर कलाकारांसाठी तो प्रेरणेचा एक स्त्रोत असल्याचे म्हटले आहे अशा शब़दात कौतुक केले आहे.

अमिर खानच्या ‘धूम ३’ या सिनेमातील त्याचे काम कौतुकास्पद असल्याचेही शाहरूख म्हणाला. एवढचं नव्हे, तर चांगल काम कसं केलं जातं हे आमिरकडून शिकण्यासारखं असल्याचे सांगत तो परिपूर्ण असल्याचेही शाहरूख म्हणाला. त्याकमुळे आगामी काळात तीनही खान बंधू मधील वाद मिटणार असे दिसते.