मिथुनेतला उल्कावर्षाव १३ आणि १४ डिसेंबरला

मिथून राशीतून होणारा उल्कावर्षाव पाहण्याची संधी आकाश निरीक्षकांना शुक्रवार १२ डिेसेबरच्या रात्री आणि शनिवारी पहाटे मिळू शकणार आहे. यावेळी तासाला किमान १२ उल्का पडताना दिसतील असा अंदाज खगोलतज्ञांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी हा उल्कावर्षाव पृथ्वी जेव्हा कॅस्टर तार्‍याजवळच्या धुळढगांतून जाते तेव्हा तेव्हा पाहता येतो. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास चंद्र माथ्यावर असणार आहे तरीही कांही तेजस्वी उल्का दिसू शकतील व चंद्र शनिवारी पहाटे मावळत असल्याने त्या काळात जास्त उल्का पाहता येतील.

धुमकेतूच्या कक्षेतून जेव्हा पृथ्वी जात असते तेव्हाही असा प्रचंड उल्कावर्षाव पाहावयास मिळतो असे खगोलतज्ञ सांगतात. मिथूनेतील उल्कावर्षावाचा शोध १८६० सालीच लागला असला तरी १९८३ साली या उल्कावर्षावाचा उगम पॅथिएन हा मिथूनेतील तारा असल्याचे समजले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment