महाबळेश्वरच्या स्ट्रोबेरीला गोवेकरांची मागणी

महाबळेश्वर – टपोर्‍या, रसरशीत. चवीला मधुर आणि लालबुंद रंगाच्या महाबळेश्वरच्या स्ट्राॅबेरीला गोवा राज्यातून मोठी मागणी असून अन्य ठिकाणांपेक्षा येथे शेतकर्यां ना दरही चांगला मिळत असल्याचे समजते. गोव्यात सध्या नाताळची धामधूम सुरू आहे. दरवर्षी या हंगामात गोव्याला देशीविदेशी पर्यटकांची एकच जत्रा भरते. यावेळी स्ट्राॅबेरीला मागणी असतेच पण त्यातही महाबळेश्वरची स्ट्राॅबेरी गोवेकर विशेष पसंत करतात असे स्ट्राॅबेरी उत्पादकांचे म्हणणे आहे.

महाबळेश्वरचे हवामान स्ट्राॅबेरीसाठी अतिशय पोषक आहे. सर्व राज्यातच या स्ट्राॅबेरीला मोठी मागणी असते. इतकेच नव्हे तर गुजराथेतूनही मोठी मागणी असते.  आता स्ट्राॅबेरीचा हंगाम जोरात असून डिसेंबर अखेरपर्यंत तो असाच राहिल असे शेतकर्यां्चे म्हणणे आहे. पाचगणी, सातारा भागातही स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेतले जाते मात्र ही फळे आकाराने छोटी असतात शिवाय चवीला थोडी आंबट असतात. तसेच ती टिकतातही कमी. मात्र महाबळेश्वरची स्ट्राॅबेरीअधिक काळ चांगली राहते असेही समजते.