फेसबुकवर मोदी सर्वाधिक चर्चित नेते

मुंबई – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मेादी भारतात फेसबुक युजरमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नेते म्हणून पुढे आले आहेत. फेसबुख टॉप इंडियन ट्रेंड २०१३ मध्ये त्यांनी मास्टरब्लास्टर सचिन आणि आरबीआयचे गर्व्हनर रघुराम राजन यांना मागे टाकले आहे. या यादीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या आयफोन पाच एस आणि मंगळयान यांनाही मोदींनी मात दिली आहे.

फेसबुकचे जगभरात महिन्याला १.१९ अब्ज अॅक्टीव्ह युजर आहेत त्यात भारतातील युजरची संख्या ८२ दशलक्ष इतकी आहे. जून २०१३ च्या तिमाहीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या यादीत मोदी, सचिन, आयफोन पाच एस, रघुराम राजन, मंगळयान यांचा समावेश होता. यात मोदींनी प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. गेल्याच महिन्यात मंगळयान मोहिम यशस्वी केल्यानंतर भारताने मंगळमोहिमेत असलेल्या देशांच्या छोट्या गटात स्थान मिळविले आहे तर तेंडुलकरने निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्याला मिळालेला भारतरत्न हा सर्वोच्य नागरी सन्मान त्याला चर्चेत ठेवण्यास कारणीभूत ठरला होता.

सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्थानांत हरियानातील सुखदेव ढाबा प्रथम क्रमांकावर आहे. त्या नंतर अमृतसरचे सुवर्णमंदिर, बांग्लासाहिब गुरूद्वार, कॅनॉट प्लेस, इंडिया गेट आणि आग्रा ताजमहाल यांचा नंबर आहे.

Leave a Comment