मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल हा याच विधिमंडळ अधिवेशनात मांडू असं लेखी आश्वासन मंगळवारी सरकारने उच्च न्यायालयात दिले आहे. त्याामुळे आता सरकारला या अधिवेशनात आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल सर्वांसमोर उघड करावा लागणार आहे.
चार वर्षापूर्वी झालेल्या आदर्श घोटाळ्याची चौकशी पूर्ण होऊन बराच वेळ काळ लोटला गेला. तरी याचा अहवाल विधिमंडळात का मांडला जात नाही असा सवाल विचारणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना सरकारने हे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता त्यााना अहवाल मांडावा लागण्र आहे.
आदर्श सोसायटीतल्या घोटाळ्याप्रकरणी तीन माजी मुख्यमंत्री, सरकारी अधिकारी, संरक्षण दलाचे अधिकारी आणि अनेक राजकीय व्यक्तींवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या अहवालाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.