अण्णांना उपोषण सोडण्याचा मुख्यमंत्री चव्हाण यांचा निरोप

राळेगणसिद्धी: राळेगणसिद्धीत मंगळवारपासून अण्णा हजारे यांनी लोकपालच्याद मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. अण्णा हजारे यांनी उपोषण सोडवावे यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामार्फत निरोप पाठवला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा निरोप अण्णांपर्यंत पोहोचवला आहे. त्यासाठी थोरात राळेगणसिद्धीत गेले आहेत.

राज्य सराकारने जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी उपोषण् सुरू केल्या नंतर, लोकपाल विधेयक याच अधिवेशनात पास करू, असे सरकारने म्हटले आहे. मात्र गेली दोन अधिवेशनं लोकपाल विधेयक चर्चेच्या प्रतिक्षेत आहे.त्यामुळेच अण्णांनी मंगळवारपासून राळेगणमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यानंतर लगेचंच पंतप्रधान कार्यालय़ाचे मंत्री नारायण सामी यांनी, लोकपाल विधेयक याच अधिवेशनात पास करू असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी या आश्वासनाचे स्वागत केले आहे. तरी कायदा पास झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे स्पष्ट केले आहे. अण्णांनी मंगळवारी सकाळी उपोषणाला निघण्यापूर्वी राळगेणच्या यादवबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी अण्णांच्या मंचावर इतर कुणीही नसेल असंही अण्णांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment