अण्णांचे उपोषण सुरू

राळेगण सिद्धी – मजबूत लोकपाल विधेयक पास करावे यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनतंत्र मोर्चाच्या बॅनरखाली आपल्या गांवी म्हणजे राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अण्णांच्या मंचावर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांच्यासाठीही सन्मानपूर्वक जागा मिळावी यासाठी प्रयत्न केले जात असून अण्णांच्या समर्थकांनी मात्र त्याला जोरदार आक्षेप घेतला आहे असे समजते.

आज सकाळी अण्णांनी गावातील यादवबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिरापुढेच उभारण्यात आलेल्या मंडपात त्यांनी उपोषण सुरू केले. यावेळी अण्णांच्या मंचावर कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नसून अण्णांना समर्थन देण्यासाठी जे उपोषण करणार आहेत, त्यांची सोय अण्णांच्या समोर मंडपात करण्यात आली आहे. अण्णांच्या सहकारी किरण बेदी येथे येणार असल्याचे सांगितले जात आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी अण्णांची तब्येत डॉक्टरांनी तपासली आहे तसेच उपोषणाच्या जागी सुरक्षा कडक ठेवण्यात आली आहे.

यावेळी अण्णा म्हणाले की चार राज्यात जनतेने काँग्रेसची मस्ती उतरवली आहे आता संसदेत जनलोकपाल विधेयक संमत झाले नाही तर आगानी लोकसभा निवडणुकात सर्व देशभरच काँग्रेसची मस्ती जनता उतरवेल.

Leave a Comment