डरबन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा पराभव झाला आहे. डरबन वन येथील दुस-या वनडे सामन्याात टीम इंडियाच्याड पराभवाला फलंदाजच जबाबदार असल्याचे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यरक्तय केले आहे. टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव झाल्या ने त्याधमुळे आगामी काळात आत्म परिक्षण करण्याची वेळ आली आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाच केली आहे. दुस-या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा १३४ धावांनी पराभव झाला. जोहान्सबर्गमध्ये १४१ धावांनी पराभूत झाल्यानंतर दुस-या सामन्यातील गोलंदाजांच्या कामगिरीवर धोनीने समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना कर्णधार धोनी म्हणाला, टीम इंडियाच्या मधल्या फळीच्या फलंदाजांनी वाईट शॉट खेळून निराशा केली. मागील सामन्याच्या तुलनेत या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.
पहिल्य सामन्याच्या तुलनेत फिरकी आणि जलद गोलंदाजांची कामगिरी चांगली होती. विकेट फ्लॅट होतं आणि जलद गोलंदाजांना करण्यासाठी जास्त काही नव्हते. त्यामुळे फलंदाजांकडून सर्व अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराश केली. त्यामुळेच पराभव सहन करावा लागला असे मत धोनी यांनी यावेळी व्यक्त केले.