दिल्लीत भाजपचा सरकार स्थापनेचा दावा नाही- हर्षवर्धन

नवी दिल्ली – भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकांत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला असला तरी आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही त्यामुळे मी उपराज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करणार नाही असे दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ.हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. बहुमतासाठी घोडे बाजार करणार नाही. त्यापेक्षा जो कोणी सत्तेवर येईल त्याला पूर्ण सहकार्य करू आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू असेही ते म्हणाले. भाजपला बहुमत मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न अपुरे ठरले असे वसांगून ते म्हणाले की नागरिकांच्या हितासाठी आगामी सरकार ज्या योजना राबवेल त्याला आम्ही पाठिबाच देऊ.

दरम्यान २८ जागा जिंकलेल्या आमआदमी पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांच्या घरी पक्षाची पुढील रणनिती ठरविण्यासाठी बैंठक सुरू झाली असून जेडी यूचे एकमेव आमदार शेाएब इकबाल यांना आम आदमी पक्षाला समर्थन देण्याची तयारी दाखविली आहे. या संदर्भात काँग्रेसबरोबर बोलणी करण्याची तयारीही शोएब यांनी दाखविली असल्याचे समजते.

Leave a Comment