केजरीवालांच्या झाडूने केला दिल्लीत काँग्रेसचा पराभव

नवी दिल्ली – दिल्ली निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमीने मोठी झेप मारत अनेक वर्षे दिल्लीच्या सत्तेत राहणार्‍या काँग्रेचा पराभव केला आहे. मुख्य म्हणजे विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा 22 हजार मतांनी पराभव अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून या पक्षाने 27 जागांवर विजय मिळवला आहे. या पक्षाला केवळ 11 ते 16 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत आपने चांगलीच मुसंडी मारली.

70 जागांसाठीच्या मतमोजणीदरम्यान दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि आम आदमीमध्ये चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपने बहुमताकडे वाटचाल केल्याने भाजपला आता कोणाची मदत घेण्याची गरज नाही. दिल्लीत सुरूवातीला त्रिशंकु परिस्थिती असल्याचे चित्र दिसून येत होते. भाजप पहिल्या तर केजरीवाल यांचा आप दुसर्‍या स्थानावर तर सत्तेत असलेल्या काँग्रेसला जोराचा झटका बसला आहे. काँग्रेस तिसर्‍या स्थानकावर गेला आहे.

केजरीवाल यांच्या आप पक्षाकडून दिल्ली विधानसभा निवडणूकीसंदर्भात मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून या निकालांनंतरच्या त्यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे. मात्र, आपने कोणाबरोबर जाणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आप विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल 22 हजार 682 मतांनी पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिय् दिली आहे. दिल्लीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने चमकदार कामगिरी केली आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेस भाजपला धक्का देत अनेक जागांवर विजय मिळवत यश संपादन केले आहे. अरविंद केजरीवालांनी जबरदस्त करिष्मा दाखवत दिल्लीतून काँग्रेसचा पुरता सफाया केला.

केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीत जोरदार मुसंडी मारली. आपच्या झाडूने काँग्रेसचा जणू सफायाच केला. दिल्लीत पूर्ण 70 जागांचा कल स्पष्ट झाला. काँग्रेसची तिसर्‍या स्थानावर पिछेहाट झाली आहे. भाजप 33 जागांवर विजय मिळविला आहे. तर आम आदमी पक्ष 27 जागांवर तर काँग्रेस मात्र केवळ 8 जागांवर यश मिळाले आहे. तर दोन जागांवर इतर पक्षांचे उमेदवार जिंकले आहेत.