आमिरच्या धूम-३चे केले सलमानने प्रमोशन

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अमिरखान सलमान खानची खूपच प्रशंसा करीत आहे. आमिरच्या मते सलमान खान हा त्याच्यापेक्षा मोठा स्टार आहे. याबाबत बोलताना आमिर म्हणाला, ‘ अभिनेता सलमान स्टार पावरचा पावर हाउस आहे; त्याला कधीच काही करण्याची गरज लागत नाही. तो फक्त बेल्ट हालवतो आणि चश्मा व्यावस्थित करतो. केवळ कंबर हालवून तो सर्वांवर जादू करतो.’

अभिनेता सलमानला कधीच त्याच्या सिनेमाची मार्केटिंग करण्याची गरज पडली नाही. प्रेक्षकच त्याच्या सिनेमाची वाट पाहत असतात. त्यामुळे त्याला कधीच सिनेमाचे प्रमोशन करावे लागले नसल्याचे अमिरने यावेळी बोलताना स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’ च्या सेटवर आमिर खानच्याे ‘धूम -३’ या सिनेमाचे प्रमोशन टोपी घालून केल्याने अमीर त्याच्यावर सध्या खूपच खूष आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आमिरखान प्रमोशनसाठी कुठेच जात नाही. त्यामुळे त्याने केवळ दोस्तीसाठी हे सर्व काही केले आहे. यावेळी सलमाने अमिरच्या सिनेामाचे टोपी घालून प्रमोशन केले आहे. यामुळे अमिरला किती फायदा झाला हे आगामी काळात समजणार आहे.