टोयोटोची नवी लँड क्रूझर प्राडो बाजारात

पुणे – टोयोटो आणि किलोस्कर मोटर्स तर्फे लक्झरी स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल प्राडोचे नवे व्हर्जन बाजारात आणले गेले आहे. या लँड कू्रझरची किंमत एक्स शोरूम ८४ लाख ८७ हजार रूपये आहे. या गाडीची अंतर्गत रचना पूर्णपणे बदलली गेली आहे असे सांगितले जात आहे.

टोयोटो किलोस्कर मोटर्सचे उप व्यवस्थापकीय संचालक संदीप सिग या संदर्भात म्हणाले की नवीन व्हर्जनमध्ये  क्रॉल कंट्रोल ही नवी सिस्टीम बसविली गेली आहे. यामुळे निसरड्या किवा धोकादायक रस्त्यावर अॅक्सिलरेटर व ब्रेक ऑपरेशन अनावश्यक ठरतात व चालक पूर्ण लक्ष स्टेअरिंगवर केंद्रीत करू शकतो. त्याचबरोबर मल्टी टेरिन यंत्रणाही गाडीत आहे. यात रस्त्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार चालक ड्रायव्हिंग ऑप्शन निवडू शकतो. म्हणजे खडकाळ, ठिसूळ, चिखल, वाळू अशा विविध रस्त्यांवर योग्य ऑप्शन निवडता येतो.

गाडीचे बुकींग सुरू झाले असल्याचे सांगून सिंग म्हणाले की आम्ही २००४ सालीच पहिले प्राडो मॉडेल सादर केले होते व तेव्हापासून ग्राहकांची त्याला चांगली पसंती मिळत आहे

Leave a Comment