
पणजी- लैंगिक अत्याचार प्रकरणी तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज शनिवारी त्याला गोव्यातल्या कोर्टात हजर करण्यात आले आहे. आणखी चौकशी करायची असल्याने तेजपालची कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र तेजपालच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला. पण कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत तेजपालच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली.
