दरबन- दक्षिण आफ्रिकेविरूद़धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागल्याने रविवारी होत असलेला सामना महत्वाचा मानला जात आहे. या मालिकेतील आव्हान टिकवून ठेवाण्यासाठी टीम इंडियाला रविवारचा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना रविवारी भारतीय वेळेनुसार दीड वाजता दर्बनच्या किंग्जमेड स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
टीम इंडियाने आफ्रिकेविरूदधचा पहिला सामना १४१ रनच्या मोठ्या फरकाने गमावला. त्यामुळे आजचा सामना हा भारतासाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती आहे. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण की पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजानी भारतीय गोलंदाजाना चांगलंच झोडपून काढले होते. त्यामुळे या सामन्यात भारतीय गोलंदाजानी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये गोलंदाजीची चांगली फळी निर्माण झाली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजाना देखील महत्त्वपूर्ण खेळी करणे गरजेचे आहे. फलंदाजांनी या सामन्यात शांतपूर्ण खेळी करणे हे भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकते. भारतीय फलंदाजानी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठी धाव संख्या उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा फायदा भारतीय गोलंदाजाना दक्षिण आफ्रिकेला रोखण्यास होणार आहे, असे काही बदल भारतीय संघात करणे गरजेचे आहे.