कोलकता : मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीच्या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना त्या नरेंद्र मोदीबाबत काहीच का बोलत नाहीत असा सवाल केला आहे. ममता बॅनर्जी ह्या संधीसाधू नेत्या आहेत. त्यांच्या तृणमुल कॉंग्रेस पक्षाला कसली विचारसरणी नाही. केंद्रात जो पक्ष सत्तेवर येतो त्यांच्याशी जवळीक साधून त्या ङ्गक्त सत्ता मिळवायचा प्रयत्न करतात अशी टीका माकपच्या नेत्यांनी केली आहे.
या पूर्वी तृणमुल कॉंग्रेसने भाजपाच्या विरोधात कधीच काही मत मांडले नाही आणि भाजपा सत्तेवर येताच त्यांच्याशी हातमिळवणी केली. नंतर कॉंग्रेस सत्तेवर येताच कॉंग्रेसशी जवळीक साधली. आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सत्तेवर येते की काय याची ममता बॅनर्जी वाट बघत आहेत. भाजपा सत्तेवर येताच त्या भाजपाशी हातमिळवणी करतील असे टीकास्त्र माकपाच्या नेत्यांनी एका पत्रकाद्वारे त्यांच्यावर सोडले आहे.
मार्क्सवादी कम्युनिष्ट पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्यजी यांनी ममता बॅनर्जी यांच्या संधीसाधूपणावर आसूड ओढले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विरुध्द त्या शब्दानेही बोलत नाहीत पण दुसर्या बाजूला जातीय शक्तींशी लढण्याच्या गोष्टी बोलतात. असे त्यांची दुहेरी नीती आहे, असे बुध्ददेव भट्टाचार्यजी म्हणाले.