महिलांशी बोलण्याची भीती वाटते-फारूख अब्दुल्ला

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. गांगुली यांच्यावर महिला प्रशिक्षणार्थी वकिलाने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला म्हणाले, आता महिलांशी बोलण्याची, त्यांना कामावर ठेवण्याचीही भीती वाटते, कधी काय होईल सांगता येत नाही.

केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केन्या्ने सर्वत्र खळबळ माजली आहे. समाजात गेल्या काही दिवसांपासून महिलावरील अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे एखाद्या स्त्रीशी बोलण्याची किंवा तिला कामावर ठेवण्याचीही भीती वाटते. कधी काय होईल सांगता येत नाही, एखादे दिवस आम्हालाच तुरूंगात जावे लागणार नाही ना, अशी चिंता वाटत असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला असून एवढ्या संवदेनशील विषयावर फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्या नेत्याने केलेल्या विधानामुळे आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या स्मृती इराणी यांनी दिली आहे. त्यांचे हे विधान अतिशय दुर्दैवी असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.