पहिले मूल होणे जोखमीचे

भारतात विवाह ठरवताना उपवर मुलगा आणि मुलगी दोघेही आपल्या आईवडिलांच्या पोटी पहिल्यांदा जन्मलेले असतील अशा मुलाचा आणि मुलीचा विवाह करत नाहीत. मुलगी पहिली असेल तर मुलगा दुसरा किंवा तिसरा असावा आणि मुलगा पहिला असेल तर मुलगी तिसरी किंवा तिसरी असावी असा संकेत आहे. त्यामागचे कारण काय आहे हे माहीत नाही. परंतु पहिले मूल असणे हे मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे विकार होण्याचे कारण असते. म्हणजे पहिल्या अपत्यांना हे दोन विकार होण्याची शक्यता जास्त असते. न्यूझीलंडमधील एका अभ्यासाच्या अंती हा निष्कर्ष काढण्यात आला.

त्या देशामध्ये ४ ते ११ वर्षे वयोगटातील ८५ निरोगी मुला-मुलींची तपशिलात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांच्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण, त्यांची उंची, वजन आणि शरीराची रचना या सगळ्यांचा अभ्यास करण्यात आला. या ८५ मुला-मुलींमध्ये ३२ जण हे आपल्या आईवडिलांच्या पोटी पहिल्यांदा जन्माला आलेले होते. या ३२ जणांच्या शरीरात इन्सुलीन तयार करण्याची क्षमता अन्य ५३ अपत्यांच्या पेक्षा २१ टक्क्यांनी कमी होती असे आढळले.

त्याचबरोबर या ३२ जणांचा रक्तदाबसुध्दा अन्य मुलांपेक्षा थोडा जास्त असल्याचे दिसून आले. पहिले असण्याचा हा दुष्परिणाम तर आहेच परंतु ही पहिली अपत्ये अन्य मुलांच्या पेक्षा उंच आणि सडपातळ असण्याची शक्यता जास्त होती. या पहिल्यांदा जन्माला आलेल्या मुलांचे काही गुणधर्म सारखेच कसे असा प्रश्‍न समोर ठेवून याची कारणे शोधली असता असे आढळले की एखाद्या महिलेच्या पोटी पहिले बाळ जन्माला येते तेव्हा तिच्या गर्भाशयात काही बदल घडतात. त्या मुलाच्या जन्मापूर्वी तिचे गर्भाशय सामान्य असते.

परंतु पहिला अपत्य संभव होतो तेव्हा त्या अपत्याची वाढ होण्याच्या उद्देशाने तिच्या गर्भाशयात काही बदल व्हायला लागतात. मातृत्वाच्या निमित्ताने होणारे हे बदल पहिल्या मुलाच्या वेळेसच होतात. दुसर्‍या अपत्याच्या वेळी तसा काही प्रश्‍न उद्भवत नाही कारण पहिल्याच्या निमित्ताने तो बदल होऊन गेलेला असतो आणि पहिल्यामुळे पहिलटकरिणीच्या संबंधात होणार्‍या या बदलामुळे पहिल्या अपत्याच्या प्रकृतीत काही वैशिष्ट्ये निर्माण होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment