दोन महिलांनी दिली केबल व्यावसायिकाच्या हत्येची सुपारी

उल्हासनगर (मुंबई) – व्याजाचे पैसे बुडवण्यासाठी महिलांनी सुपारी देऊन केबल व्यवसायिकाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. काल हाजी मलंग परिसरात राजा ओचलानी या केबल व्यवसायिकाचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. त्याच्या कुटुबींयांनी एक कोटी रूपयांच्या खंडणीसाठी राजा ओचलानीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली होती.

गेल्या पंधरा दिवसांपासून तो बेपत्ता होता. पोलिसांनी या प्रकरणी दोन महिला आणि एका तरूणाला अटक केली आहे. दोन महिलांनी सुपारी देऊन केबल व्यावसायिकाचा खून केल्याने उल्हासनगर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सुपारी देणार्‍या दोन महिलांसह आणि एका तरुणाला अटक केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हा केबल व्यवसायीक बेपत्ता होता, या दरम्यान त्याच्या घरच्यांकडे आरोपींनी एक कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

त्यामुळे राजा ओचलानी या केबल व्यावसायिकाचं खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या कुटुबीयांनी उल्हासनगर पोलिसांमध्ये नोंदवली होती.
उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलिस ठाण्यात 27 नोव्हेंबर रोजी राजा उर्फ भगवानदास ओचलानी हा केबल व्यवसायीक बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राजाच्या घरच्या कडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, त्यानंतर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा येथील सेन्ट्रल पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी राजा ओचानी याचा मित्र आकाश मेंडेन याला ताब्यात घेतलं आणि तपासाची चक्रे वेगात फिरण्यास सुरुवात झाली.

राजा ओचलानी याने बबिता सिंग आणि प्रिया आयलानी या दोन महिलांना व्याजाने पैसे दिले होते. त्या पैशांच्या परतफेडीसाठई तो सतत त्यांच्याकडे तगादा लावत असल्याची माहिती आकाशने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी बबिता आणि प्रिया दोघींना ताब्यात घेतले आणि खुनाचे गूढ उकललं. बबिता आणि प्रिया यांनी आकाश आणि राजेश यांना तब्बल चार लाख रूपये देऊन त्यांच्याकडून राजा ओचलानीचा खून करवून घेतला. राजा ओचलानी याला बबिता सिंग हिने घरी बोलावले आणि आकाश आणि राजेश यांनी त्याच्या डोक्यात सळई घालून हत्या केली आणि त्याचा मृतदेह अंबरनाथ एमआयडीसी परिसरात परीसरात टाकून दिला.

Leave a Comment