गेल्या दहा वर्षात प्रथमच डिझेलची मागणी घटली असल्याचे इंडियन ऑईल कार्प.चे अध्यक्ष आर.एस. बुटाला यांनी सांगितले. वल्ड एनर्जी समिटमध्ये ते बोलत होते. बुटाला म्हणाले की ही घट प्रामुख्याने डिझेलची झालेली दरवाढ व तुलनेने वीज पुरवठ्यात झालेली सुधारणा यामुळे आहे. भारतात इंधनासाठी वापरल्या जाणार्या पेट्रोलियम पदार्थात डिझेलचा वाटा ४५ टक्के इतका आहे.
बुटाला म्हणाले की डिझेल हे भारतात सर्वाधिक खप असलेले इंधन आहे.२००३-०४ सालापासून दरवर्षी डिझेलची मागणी ६ ते ८ टक्कयांनी वाढते आहे मात्र यावर्षी ही मागणी ०.८ ते १ टक्कयाने कमी झाली आहे. डिझेल किमतीवरील नियंत्रणे उठविण्यात आली आहेत तेव्हापासून दर महिन्याला डिझेलच्या किमती ०.५० पैशांनी वाढत आहेत. जानेवारीपासून या किमती साडेसहा रूपयांनी वाढल्या आहेत त्यामुळे डिझेलच्या मागणीवर परिणाम झाला आहे. त्यावेळी वीजपुरवठ्यात सुधारणा झाल्याने जनरेटरसाठी डिझेलचा वापर कमी झाला आहे. अर्थात अजूनही डिझेल उत्पादन खर्चापेक्षा सुमारे १० रूपये कमी दरानेच विकले जात आहे.
डिझेलची मागणी कमी झाली असली तरी पेट्रोलची मागणी मात्र एप्रिल ते आक्टोबर या काळात १० टक्कयांनी वाढली असल्याचेही ते म्हणाले.