कैटरीना ठरली चौथ्यांदा जगातील सर्वात सेक्सी महिला

एका मॅगझिनने आशियातल्या ५० सेक्सी महिलांची यादी जाहीर केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कैटरीना कैफ सलग चौथ्यांदा जगातील सर्वात सेक्सी आशियायी महिला ठरली आहे. एका साप्ताहीकने केलेल्याच सर्वेक्षणात अभिनेत्री कैटरीनाने प्रियंका चोप्रा, दिपीका पादुकोणला मागे टाकत हा बहुमान मिळवला आहे.

अभिनेत्री कैटरीना पाठोपाठ प्रियंका चोप्राने दुसरा क्रमांक मिळवला आहे. टेलिव्हिजन कलाकार दृष्टी धामी तिस-या क्रमांकावर आहे. तर दिपीका पादूकोणला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. कैटरीना कैफचा आगामी चित्रपट धूम- ३ लवकरच रिलीज होतो आहे. त्या पार्श्वभुमीवर मिळालेल्या या नव्या बहुमानानं ती चांगलीच आनंदात झाली आहे. चौथ्यांदा आशियातील सर्वात सेक्सी महिला ठरल्याची बातमी ऐकल्यानंतर मी खुपच आंनदीत झाल्याचे कैटरीनाने म्हटले आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळवत १२ वा क्रमांक पटकावला आहे. तर धक-धक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने देखील आपला करिष्मा अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट करत ५० महिलांच्या यादीत २३ वा क्रमांक मिळवला आहे. तर श्रीदेवीनेही या यादीत ४० वे स्थान मिळवले आहे.

Leave a Comment