काश्मिरी महिलेवर नागपुरात बलात्कार, दोघांना अटक

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले बलात्काराचे सत्र सरूच आहे. नागपूर येथे संत ताजुद्दीन बाबांच्या ऊरुसासाठी आलेल्या काश्मिरी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्कालळ या प्रकरणातील आरोपी नियाज अहमदनी आणि मोहम्मद एजाज उर्फ रफीक या दोघांना अटक केली आहे.

नागपूर येथील संत ताजुद्दीन बाबांच्या ऊरुसासाठी पीडित महिला एक डिसेंबरला आपली मुलगी आणि नातवांसोबत आली होती. ती राहण्यासाठी हॉटेल शोधत होती. तेव्हा नियाजने तिला एका हॉटेलच्या गच्चीत जागा दिली. यावेळी अपरात्री नियाजने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर दुस-या दिवशी एजाज उर्फ रफीकने त्यांची दुस-या एका हॉटेलात सोय करण्याच्या बहाण्याने या महिलेवर बलात्कार केला.

दरम्यान, या प्रकरणी नागपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये अखेर पीडित महिलेने तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ सुत्रे हालवून या प्रकरणातील आरोपी नियाज अहमदनी आणि मोहम्मद एजाज उर्फ रफीक या दोघांना अटक केली आहे.