क्रीडा संघटनांचे प्रमुख खेळाडूंनीच असावे – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी देशातील खेळांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. क्रीडा संघटनांचे प्रमुख उद्योगपतींनी नव्हे खेळाडूंनीच असले पाहिजे असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. देशातील हॉकीच्या स्थितीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. एकवेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीमध्ये भारताचा दबदबा होता मात्र आत त्याच भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर झगडावे लागत आहे.

खेळातील राजकरणामुळे हॉकी रसातळाला गेल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. हॉकीमध्ये आठवेळा ऑलिंपिकचे सुवर्णपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघ लंडन ऑलिंपिकमध्ये बाराव्या स्थानावर होता. विश्वचषक 2010 मध्ये भारत आठव्या स्थानावर होता. सहापैकी भारताला फक्त एकच सामना जिंकता आला. हॉकीतील राजकरणामुळे इंडियन हॉकी फेडरेशन आणि हॉकी इंडिया अशा दोन संघटना झाल्या असून, कोणाची संघटना अधिकृत यावरुन त्यांच्यामध्ये वाद सुरु आहेत.