आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी भाजप नेते संरक्षणमंत्र्यांची भेटणार

नवी दिल्ली – आयएनएस विक्रांतला वाचवण्याच्या प्रयत्नांना आता वेग आला असून या मोहिमेत भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात भाजप नेते गोपीनाथ मुंडे, किरीट सोमय्या आणि प्रकाश जावडेकर हे संरक्षणमंत्री ए. के. अँटोनींना भेटणार आहेत.

भारतीय नौदलातर्फे आयएनएस विक्रांतचा लिलाव करण्यात येणार आहे. आयएनएस विक्रांतचा संग्रहालय म्हणून सांभाळ करण्यात राज्य सरकार आणि नौदल अपयशी ठरल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आयएनएस विक्रांतने 1971च्या युद्धात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र नौदलाच्या खछड विक्रांतचा लिलाव दुदैर्वी असल्याचे मत माजी लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे. खछड विक्रांतचे म्युझियम करायला हवे असे मतदेखील हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment