पाच दूरस्थ ग्रहांवर नासाला सापडले पाणी

वॉशिंग्टन – पृथ्वीच्या पलीकडे आणि विशेषत: आपल्या सूर्यमालेच्या बाहेर जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या प्रयत्नाला मिळालेला सकारात्मक संकेत म्हणून अमेरिकेतल्या नॅशनल ऍरॉनॅटिकल ऍन्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा) या संघटनेला पाच दूरस्थ ग्रहांवर पाणी असण्याची शक्यता आढळली आहे. हे पाणी पृथ्वीवरल्या पाण्याच्या स्वरूपात जरी नसले तरी ते धुक्याच्या स्वरूपात आहे.

हे पाच ग्रह केवळ आपल्या सूर्यमालेच्याच नव्हे तर आपल्या आकाशगंगेच्याही बाहेर आहेत आणि त्यांची नावे शास्त्रीय स्वरूपात निश्‍चित करण्यात आली आहेत. म्हणजे आपल्या सूर्यमालेतल्या ग्रहांना आपण मंगळ, बुध, गुरू अशी नावे देतो तशी नावे या ग्रहांना नाहीत. परंतु त्यांच्या स्थानांवरून आणि पृथ्वीपासूनच्या अंतरावरून शास्त्रीय पद्धतीने नावे आणि क्रमांक दिलेले आहेत.

या ग्रहांचा वेध हर्बल या दुर्बिणीने घेतला आहे. या ग्रहांच्या कक्षांमध्ये धुके आढळलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या वातावरणात ओलसरपणाही असल्याचे संकेत मिळाले आहेत. या बाह्य संकेतांवरून तिथे पाणी असावे असा अंदाज करण्यात आला आहे. यातल्या काही ग्रहांवरचे तापमान अतीशय थंड आहे. त्या शीत वातावरणामागे काय कारण आहे याचा अंदाज घेतला जात आहे. तिथले हे थंड हवामान पाण्यामुळे आहे की, काही विशिष्ट वायूंच्या प्रक्रियेमुळे आहे याचा वेध घेतला जात आहे.

Leave a Comment