सर्दीवर साधेच पण सोपे उपाय

बहुतेकांना आयुष्यात कधीना कधी सर्दी होतेच आणि सर्दी झाली की सर्वच जण कसली ना कसली गोळी किंवा औषध घेतातच. मात्र डॉक्टरांचे मत असे आहे की सर्दी हा एक हवेतल्या बदलाचा किंवा हवेतून आलेल्या जंतुसंसर्गाचा परिणाम असतो. साधारणतः सर्दी झाली की कसलेही औषध न घेता ती तीन दिवसांत आपोआप बरी होत असते. काही अपवाद आहेत. त्यांची सर्दी तीन दिवसांपेक्षा जास्त लांबते. परंतु सर्दीच्या कालावधीत लोकांना खूप त्रास होतो. नाकपुड्याच्या आतील अस्तर दुखायला लागते, ते चरचरायला लागते आणि हा प्रकार लहान मुलांच्या बाबतीत जास्त घडतो.

अशा प्रकारच्या सर्दीवर औषधे न घेता काही साधे साधे उपाय केले तर सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो. पहिला उपाय म्हणजे कांदा लसूण भरपूर खाणे. भारतीय संस्कृतीमध्ये कांदा आणि लसूण या दोन खाद्य पदार्थांना वर्ज्य ठरवलेले आहे. परंतु आयुर्वेदाने त्यांना तसे मानलेले नाही. कारण दोन्हींमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत. या दोन वस्तूंचा खाण्यात भरपूर वापर करावा. कारण कांदा आणि लसूण हे दोन्हीही जंतुविरोधी असतात. भरपूर पाणी किंवा द्रव पदार्थ प्राशन करणे हा एक चांगला उपाय सर्दीवर मानला जातो.

पाणी किंवा ङ्गळांचे रस भरपूर प्राशन केले तर सर्दीचा त्रास कमी होतो. मात्र हे द्रव पदार्थ प्राशन करताना दारू आवर्जून टाळावी. कारण दारूमुळे सर्दी वाढण्याचा संभव असतो. सर्दीवरचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे वाङ्गारा घेणे. एका धातुच्या भांड्यात पाणी घ्यावे, त्याला भरपूर उकळावे. त्याला वाङ्गा यायला लागल्या की उतरवावे आणि चिनी मातीच्या भांड्यात घ्यावे. असे हे वाङ्गाळलेले पाणी असलेले भांडे टेबलवर ठेवावे आणि खुर्चीवर बसून डोक्याभोवती टॉवेल घेऊन या भांड्यातल्या पाण्याच्या वाङ्गा नाकावाटे आत घ्याव्यात. असे केल्याने सर्दी कमी होते.

कारण सर्दी झालेल्या सर्व आतील अवयवांना उष्णतेची छान ट्रिटमेंट मिळते. सर्दीवरचा हा सर्वात प्रभावी इलाज मानला जातो. तो बिनखर्ची आहे, सहज करता येतो, त्याला ङ्गार वेळ लागत नाही आणि त्याचे कसलेही साईड इङ्गेक्टस् शरीरावर होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्दी झाल्यावर धूम्रपान आवर्जून टाळावे. अशा साध्या युक्त्या आहेत. मग औषध कशाला हवे?

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही