निस्सानची ब्लेड ग्लायङर टोकियो शो मध्ये सादर

कारवेड्या लोकांना त्यातही स्पोर्टस कारचे शौकिन असणार्‍यांसाठी एक खूष खबर जपानी कार कंपनी निस्सानने आणली असून त्यांनी त्यांची ब्लेड ग्लायडर ही नवी स्पोर्टस कार टोकियोतील ऑटो शो मध्ये सादर केली आहे.

कारवेड्यांना आकर्षक लूक, हायस्पीड, दमदार इंजिन आणि आरामदायी गाड्या अधिक पसंत असतात. ग्लायडर या सर्व अपेक्षा पुर्‍या करणारी गाडी आहे. निस्सानची ही कन्सेप्ट कार आहे. ग्लायडरच्या आकाराची ही गाडी ग्राहकांना वेड लावेल असा कंपनीचा दावाही आहे. बरेच वेळा कन्सेप्ट कार कंपन्यांकडून सादर तर केल्या जातात मात्र त्यांच्या उत्पादनाला कायदेशीर परवानगी मिळत नाही कारण अनेकवेळा त्यात सुरक्षेच्या दृष्टीने अनेक त्रुटी असू शकतात. ग्लायडरला मात्र ती भीती नाही कारण वाहन नियमाचे सर्व निकष या गाडीने पुरे केले आहेत.

गाडीचे डिझाईन एखाद्या ग्लायडरप्रमाणे असून यात तीन लोकाना बसता येते. चालकाची जागा फ्रटला पण मधोमध आहे तर दोन जण मागे बसू शकतात. या कारचा डॅशबोर्ड फॉर्म्युला वनची आठवण करून देणारा आहे. आता ही कार प्रत्यक्षात बाजारात विक्रीला कधी येते याचीच प्रतीक्षा आहे.

Leave a Comment