नितेश राणे आणि अन्य तिघांची जामिनावर सुटका

पणजी – गोव्याच्या हद्दीतील महामार्गावरील टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांना मारहाण करून तेथे नासधूस केल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेले स्वाभिमान संघटनेचे प्रमुख नितेश राणे आणि त्यांच्या तीन साथीदारांची म्हापसा न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

पेडणे पोलिसांनी नितेश राणे आणि त्यांच्या नऊ साथीदारांना या हल्ला प्रकरणात काल सायंकाळी अटक केली होती. त्यातील चार जणांची काल रात्री जामिनावर सुटका करण्यात आली; परंतु अन्य पाच जणांना मात्र आज पुढील रिमांडसाठी कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.

काल नितेश राणे हे आपल्या समर्थकांसह गोव्याकडे जात असताना महाराष्ट्र-गोवा सीमेवरील टोलनाक्यावर त्यांनी टोल देण्यास नकार दिल्याने त्यांना टोलवरील कर्मचार्‍यांनी अडवले हंोते. त्यामुळे चिडूून त्यांनी या नाक्यावर मोडतोड केली होती. या टोलनाक्यावर गोव्याच्या बाहेर रजिस्ट्रेशन असलेल्या वाहनांकडून टोलवसूल केला जातो; परंतु राणे आणि त्यांच्या समर्थकांनी टोल देण्यास नकार दिला होता.

Leave a Comment