उध्दवच बाळासाहेबांचे वारस- रामदास आठवले

मुंबई – शिवसेनेचे कार्याध्यचक्ष उद्धव ठाकरे यांच्याक पाठीशी खंबीरपणे उभे राहत रामदास आठवले आपला पाठिंबा दर्शविला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची स्टाईल बाळासाहेब ठाकरेसारखी नसली म्हणून काय झाले?… काम करण्याची पद्धत तरी तीच आहे….’ रिपाइं नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, उध्दव चांगल्या पध्दतीने काम करत असून तेच बाळासाहेबांचे वारस आहेत. शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नाराजीनाट्य घडत असले तरी मित्रपक्ष म्हणून उद्धव ठाकरेंवर विश्वास असल्याचे रिपाइं नेते यांनी म्हटले आहे. यावरच आठवले थांबले नाहीत तर ‘ज्यांच्याकडे बाळासाहेबांसारखी भाषणाची स्टाईल आहे त्यांनी स्टाईल मारावी’ असा टोलाही त्यांनी यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर राज्यसभेवर जाणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगत, आपली इच्छाही त्यांनी स्पष्ट केली आहे. राज्यसभेच्या सातपैंकी सहावी सुरक्षित जागा मला मिळायलाच हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.